‘लातूरचा पाणी प्रश्न काँग्रेस नेत्यांमुळे बिकट झाला’

टीम महाराष्ट्र देशा- विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी शेवटचे तीन दिवस राहिले असल्यानं, सर्वच पक्षाचे नेते आणि उमेदवारांनी प्रचारात वेग घेतला आहे. सभा, कोपरा बैठका, प्रचार फेऱ्या आणि मतदारांशी थेट संपर्क यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नांदेड जिल्ह्यात नरसी, मुखेड आणि किनवट इथं महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. काँग्रेसच्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळाच्या तुलनेत आपल्या सरकारनं पाच वर्षांत तिप्पट काम केलं असल्याचं मुख्यमंत्री मुखेड इथल्या सभेत म्हणाले.

लातूर इथले महायुतीचे उमेदवार शैलेश लाहोटी यांच्या प्रचारासाठी काल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी तसंच कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी प्रचार सभा घेतली. काँग्रेस पक्ष दिशाहीन झाला असल्यानं तो राज्याला दिशा देऊ शकणार नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली. लातूरचा पाणी प्रश्र्न काँग्रेस नेत्यांमुळे बिकट झाल्याची टीका पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी केली. तर मुख्यमंत्र्याशी चर्चा करुन पाणी प्रश्न सोडवू, असं येडियुरप्पा म्हणाले.

महत्वाच्या बातम्या