fbpx

भावाला उमेदवारी न मिळाल्यानं मुख्यमंत्र्यांचे लाडके संभाजी पाटील निलंगेकर नाराज

टीम महाराष्ट्र देशा : बीडची जिल्हापिरीषद काबीज करण्यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना मदत करण्याचे बक्षीस माजी मंत्री सुरेश धस यांना लातूर-उस्मानाबाद विधान परिषद निवडणुकीचे तिकीट देऊन दिले आहे. मात्र या तिकिटावर मुख्यमंत्र्यांचे लाडके आणि विश्वासू सहकारी कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपल्या बंधुंसाठी दावा केला होता, तरी ही जागा मिळवण्यास पंकजा मुंडे यांनी यश मिळवलंय. अशात आता संभाजी पाटील निलंगेकर हे नाराज असल्याची बातमी हाती येत आहे. सुरेश धस यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संभाजी पाटील निलंगेकर हे हजर राहणार नाहीत.

संभाजी पाटील निलंगेकरांचे भाऊ अरविंद निलंगेकरांना उमेदवारी मिळावी म्हणून ते सुरवातीपासून प्रयत्नशील होते. पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज असल्याचं कळतं आहे.

दरम्यान भारतीय जनता पार्टीने काढलेल्या प्रेस नोट मध्ये २ मंत्र्यांच्या उपस्थिती मध्ये सुरेश धस अर्ज भरणार असल्याच स्पष्ट लिहिले होते. मात्र संभाजी पाटील निलंगेकर हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये अतिशय चुरशीची लढत या मतदार संघात होणार असल्याने निलंगेकर यांच्या नाराजीचा फटका पक्षाला बसणार का ? हे पहाण महत्वाच असणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 3 मे अंतिम तारीख आहे. 21 मे रोजी मतदान होईल, तर 24 मे रोजी मतमोजणी होणार आहे.