मंत्री निलंगेकरांच्य निवासस्थानासमोर मराठा आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन

sambhaji patil nilengekar

लातूर :  आजपासून लातूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा समितीने घेतला होता. या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आले.

आज सकाळपासून, मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांनी लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात मराठा आरक्षण आंदोलनातील कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग आहे. परिणामी, जिल्हा पोलीस दलाच्यावतीने तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.

आंदोलकांनी यावेळी संभाजीराव पाटील – निलंगेकर यांच्यासह इतर मंत्री आणि पंतप्रधान यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. घरासमोर आंदोलन होऊ नये यासाठी पोलिसांनी बॅरिकेड लावत आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला.

मराठा आरक्षण : सुनीता गडाख यांचा पंचायत समिती सभापती पदाचा राजीनामा !

अशी आहे मराठा क्रांती मोर्चाची आदर्श आचारसंहिताLoading…
Loading...