आरक्षणाचा प्रश्न मिटल्यावर महाराजांच्या स्मारकासाठी आंदोलनात उताराव लागेल : आ. अनिल भोसले

पुणे : सध्या महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चाचे वादळ घोंगावत असून, तब्बल ५७ मूक मोर्च्यांनंतर सुरु झालेले हे ठोक मोर्चे आता हिंसक होत आहेत. सत्ताधाऱ्यांची बेताल वक्तव्ये, मोर्चेकऱ्यांवर दाखल होणारे खोटे गुन्हे यामुळे वातावरण अधिक चिघळत होते. त्यामुळे मराठा समाजाकडून आता आमदार खासदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलने करण्यात येत आहेत.  आज या आंदोलकांनी आमदार अनिल भोसले यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी प्रस्ताव स्वीकारण्यासाठी आल्यावर त्यांनी ठिय्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देऊन मृतांच्या कुटुंबातील लोकांना मदत करावी व त्यांना नोकरी द्यायला हवी व मराठा समाजातील बांधवांनी आत्महत्या करू नये. तसेच राज्यातील सर्व नेते मंडळींनी एकत्र येवून एक विचाराने आरक्षण द्यायला हवे. तसेच याची राजकीय पोळी भाजू नये असे अहवान भोसले यांनी केले.

त्याचबरोबर पुण्यातील संभाजी उद्यानातील संभाजी महाराजांच्या स्मारकाविषयी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आरक्षणाचा प्रश्न मिटल्यावर आपल्या महाराजांच्या स्मारकासाठी आंदोलनात उताराव लागेल असं ठाम मत अनिल भोसले यांनी मांडल आहे. “आपण संभाजी महाराज याचं संभाजी उद्यानात स्मारक करत आहोत. त्यासाठी मी आमदार निधीतून मंजूर केलेला साडे तीन कोटी रुपये निधी खर्च देखील केला आहे. आज आपण आपल्याला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करत आहोत मात्र त्याठिकाणी संभाजी महाराजांचे स्मारक का होऊ देत नाही काम का अपूर्ण राहिले आहे, यासाठी देखील आंदोलन करावे लागणार आहे. संभाजी उद्यानात काही सत्ताधारी मंडळी स्मारक होऊ न देण्याच काम करत आहेत. त्यामुळे आपले ९ तारखेचे आंदोलन झाल्यानंतर पुणे महानगर पालिकेच्या समोर संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी आग्रही होऊन बसायचं आहे.” स्पष्ट मत आमदार अनिल भोसले यांनी मांडले आहे.

आज आरक्षणासाठी जीव देणारे उद्या जीव घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाहीत : उदयनराजे

बाष्कळ विदर्भाला वेगळे राज्य हवंय, पण ते वढू रायगडाला मान्य नाही – भिडे गुरुजी