संभाजी निलंगेकर सोडता मतदारसंघात एकही इच्छुक नाही

निलंगा: भाजपतर्फे राज्यभरात इच्छुकांच्या मुलाखती सुरु आहे. यात लातूर येथे शुक्रवारी मुलाखती घेण्यात आल्या. पाणी पुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी मुलाखती घेतल्या. यात पालकमंत्री संभाजी पाटिल निलंगेकर यांच्या मतदार संघात एकही इच्छुक पुढे आला नाही. यामूळे या मतदारसंघात निलंगेकर वन मॅन शो असणार आहेत.

लातूर जिल्ह्यात निलंगेकर यांचा मतदारसंघ सोडता इतर मतदारसंघात इच्छुकांची लाईन लागली आहे. सात पैकी सहा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. असे असताना विद्यामान आमदार असताना इच्छुक वाढल्यामूळे आश्चर्य व्यक्त केले जात आहेत. निलंगा, देवणी, शिरुर अनंतपाळ या तीन तालुक्यातचा समावेश असलेल्या निलंगा मतदारसंघात राजकीयदुष्टय संवेदनशील आहे. या मतदार संघात सतत राज्याच्या सत्तेमध्ये नेतृत्वाची संधी मिळाली आहे.

निलंगा मतदारसंघ सोडून उदगीर,औसा, अहमदपुर या मतदारसंघात अनेकांनी उमदेवारीसाठी मोठ्या चुरशीने मागणी केले आहे. निलंगा एकमेव संभाजी पाटील निलंगेकर यांनीच मुलाखत दिली आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा निलंगेकरांना संधी मिळणार असल्याची चर्चा होत आहे.

महत्वाच्या बातम्या