‘छाताडावर गोळ्या झेलू पण शिवप्रेमींनी दिलेले संभाजी महाराजांचे नाव बदलू देणार नाही’

टीम महाराष्ट्र देशा – बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ असणाऱ्या मल्टीपर्पज क्रीडांगणाला छत्रपती संभाजी महाराजांचे देण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील शिवप्रेमींनी क्रीडांगणाला छत्रपती संभाजी महाराजांचा नामकरणाचा फलक लावला आहे.

तर दुसरीकडे छत्रपती संभाजी महाराजांच्या नामकरणाचा फलक काढण्यासाठी नगराध्यक्षांनी पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाला पुढे केले.

यावेळी मल्टीपर्पज क्रीडांगणा जवळ हजारो शिवप्रेमी जमा झाले होते. त्यावेळी शिवप्रेमींनी हा सगळा प्रकार विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना सांगितला.

त्यावेळी धनंजय मुंडे यांनी क्षणाचाही विलंब न करता पोलीस अधीक्षक जि. श्रीधर आणि डी.वाय.एस.पी खिरडकर यांना फोने करून कायदासुवेस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याचा विचार प्रशासनाने करावा, शिवप्रेमींच्या मागणीची दाखल आणि आदर प्रशासनाने राखावा. शिवप्रेमींनी दिलेले संभाजी महाराजांचे नाव जर कोणी बलाचा वापर करून काढत असेल तर वेळप्रसंगी आम्ही छाताडावर गोळ्या झेलू पण छत्रपतींचा विचार आणि नाव कधी संपू देणार नाही, असा इशाराच मुंडे यांनी यावेळी प्रशासनाला दिला.