fbpx

संभाजी भिडेंनाच मुलं झाली नाहीत, त्यांच्या आंब्याने काय होणार ?- आ.बच्चू कडू

sambhaji bhide and bacchu kadu

पुणे: मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनाच मुलं झाली नाहीत, त्यांच्या आंब्याने काय मुलं होणार ? अशी कणखर टीका करत आमदार बच्चू कडू यांनी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध केला. बच्चू कडू पिंपरी चिंचवड येथे एका आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

बच्चू कडू म्हणाले, आता आम्हाला भिडेलाच आंबे खायला घालावे लागतील. किमान पुरुषाकडून डिलिव्हरी होईल आणि यानिमित्ताने नवा उपक्रम सुरू होईल. अशी खिल्ली देखील कडू यांनी उडवली. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यात तशी गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. त्याचा रिपोर्ट देऊन आम्ही गुन्हा दाखल कसा होईल. मनोहर भिडे स्वतःला शिक्षणातील गोल्ड मेडलिस्ट म्हणवतात आणि ते जर असं वक्तव्य करत असतील. तर त्यांच्यावर गुन्हाच दाखल करायला हवा. असे बच्चू कडू म्हणाले.

दरम्यान, संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा सोशल मिडीयावर तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी भिडेंवर टीका केली आहे. त्यामुळे भिडे गुरुजी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसत आहेत. यावेळी कारण आहे ते त्यांच्या बागेतील आंब्याचं. भिडे गुरुजी यांनी काल नाशिक येथे बोलताना ‘माझ्या बागेतील आंबे खाल्यावर मुलं होतात’ असा अजब दावा केला आहे. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यामुळे ते अंधश्रध्दा वाढवत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

नेमक काय म्हणाले होते संभाजी भिडे ?

लग्न होऊन 10 – 15 वर्ष झालेल्यांनाही पोर होत नाही, अशा स्त्री-पुरुषांनी, पती पत्नींनी ती फळं खाल्ली, तर निश्चित पोर होईल. रोज आंबे आणून, माझ्याही बागेत, शेतात ते लावले. मी आता तुम्हाला सोडलं तर माझ्या आईशिवाय कोणाला सांगितलं नाही, ते आंबे कसे आहेत. मी आतापर्यंत 180 पेक्षा जास्त जणांना, पती-पत्नींना, जोडप्यांना खायला दिलेत आणि 150 पेक्षा जास्त जणांना मुलं झाली. ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल. अपत्य नसेल तर होते. म्हणजे त्याचा अर्थ नपुंसकत्वावर तोडगा आणि वंध्यत्वावरचा ताकद देणारा तो आंबा आहे.