लोकसभेला कॉंग्रेसमध्ये, तर विधानसभेसाठी संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांचे ‘राष्ट्रवादी पुन्हा’

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघातून लढण्यासाठी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणारे प्रवीण गायकवाड यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे वळवला आहे. लोकसभा निवडणुकीत पक्ष प्रवेशकरून देखील कॉंग्रेसने उमेदवारी तर दिलीचं नाही, मात्र पक्षाच्या नेत्यांनी आपुलकी देखील दाखवली नाही, अशी नाराजी व्यक्त करत प्रवीण गायकवाड यांनी विधानसभेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काम करणार असल्याची घोषणा केली आहे. ब्रिगेडच्या राज्य कार्यकारिणीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.

शरद पवार यांच्या पुरोगामी धोरणामुळे महाराष्ट्राची देशात ओळख निर्माण झाली आहे, समाजातील सर्व घटकांसाठी त्यांनी मोठे कामा उभे केले आहे, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यामुळे निर्णय घेण्यात आल्याचं गायकवाड यांनी सांगितले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्ष नेत्यांनी आमच्या कार्यकर्त्यांची दखल घेतली नाही, आपल्या खांद्यावर पक्षाचे उपरणे टाकले मात्र स्वीकारले नाही, अशी टीका गायकवाड यांनी कॉंग्रेस नेत्यांवर केली आहे.

पाच वर्षात फडणवीस सरकारने अधोगतीचा इतिहास रचला – जयंत पाटील

अयोध्येतील वादग्रस्त जमीन आमचीच, निर्मोही आखाड्याचा दावा

जम्मू काश्मीर झालं… आता बेळगाव प्रश्नही मार्गी लावा’