तर मुख्यमंत्र्यांनाच अटक करा; संभाजी ब्रिगेडची मागणी

shrimant kokate and balasaheb amedkar

मुंबई: भिडे गुरुजींना अटक न करण्याचे सरकारचे षड्यंत्र असून त्यांना अटक होत नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच अटक करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आज मुंबईमध्ये भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संभाजी ब्रिगेडने देखील या मोर्चाला पाठींबा दिला आहे.

Loading...

कोरेगाव- भिमा हिंसाचाराचा आरोप असलेल्या संभाजी भिडे यांना अटक करा, या मागणीसाठी आज मुंबईत भारिपकडून एल्गार रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. परीक्षा सुरु असल्यानं रॅली काढू नका, वाहतुकीला अडथळा करु नका, असं आवाहन पोलिसांनी प्रकाश आंबेडकरांना केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वात काढण्यात येणाऱ्या या रॅलीला मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. मात्र तरीही रॅली काढणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.Loading…


Loading…

Loading...