गणेशोत्सव शतकोत्तर उत्सवात आर्थिक घोटाळा ? चौकशी समिती नेमण्याची मागणी

पुणे : पुणे महापालिकेच्या वतीने ऑगस्ट 2017 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा करण्यात आला.

या उत्सवासाठी 2 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. मात्र यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम राबवले जात असताना मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला आहे. तसेच गणेशोत्सवात राबवण्यात आलेल्या उपक्रमांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याच सर्व गोष्टींची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी करत आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने महापालिकेच्यासमोर सत्ताधारी आणि प्रशासनाचा निषेध करत आंदोलन करण्यात आलं आहे.

bagdure

१८९३ मध्ये लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. याच निमित्ताने पुणे महापालिकेच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील गणेशोत्सवाची कीर्ती जगभरात पोहचवण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे यामध्ये आयोजन करण्यात आले. ढोल-वादन स्पर्धा, शाडूच्या गणेशमूर्ती तयार करने, बाईक रॅली, अशोक हांडे यांचा ‘मराठी बाणा’ असे वेगवेगळे कार्यक्रम महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. मात्र हे सर्व होत असताना ढिसाळ नियोजन हेच सर्वात जास्त चर्चेचा विषय बनले. एकही उपक्रम चांगल्या रीतीने पार पडल्याचं पहायला मिळाल नाही.

दरम्यान, रोप्यमहोत्सव साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमांवर बाजारभावपेक्षा चढ्या दराने खर्च करण्यात आल्याचे माहिती अधिकारातून समोर आलं आहे. ढोल- वादनाचा कार्यक्रम रद्द झाला असतानाही त्याच्यासाठी १२ लाख रुपयांचा मांडव घालण्यात आल्याच दाखवण्यात आला आहे. तसेच गणेशोत्सव होऊन पाच ते सहा महिने उलटले तरी शाडूच्या मूर्तींचा गिनीस बुक रेकॉर्ड नोंदवण्याचे काय झाले हे आजही कोणतेही पदाधिकारी सांगायला तयार नाहीत. त्यामुळे कोणतेही पूर्वनियोजन नसताना घाईघाईने राबवण्यात आलेल्या रोप्यमहोत्सवाध्ये बराच आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे शहर संघटक सुभाष जाधव यांनी केला आहे.

संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनावेळी संभाजी ब्रिगेडच्या शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, उपाध्यक्ष जोतिबा नरावडे, सरचिटणीस सिद्धार्थ कोंढळकर, जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा उषा पाटील, उपाध्यक्ष सुरेखा जुजगर तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You might also like
Comments
Loading...