संभाजी बिग्रेडला खिंडार पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

नाशिक: संभाजी बिग्रेडचे नाशिक जिल्हा प्रमुख यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे, दिलीप वळसे –पाटील, हेमंत टकले, शिवाजीराव गर्जे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच नाशिक शहराध्यक्ष रंजन ठाकरे व आ.जयवंतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथील प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला.

संभाजी बिग्रेडचे जिल्हा प्रमुख योगेश निसाळ, महानगर प्रमुख प्रफुल्ल पाटील, जिल्हा सचिव जयप्रकाश गायकवाड, शहर सचिव संतोष ढमाले, नाशिकरोड अध्यक्ष राजेश जाधव, पंचवटी अध्यक्ष किरण मानके यांच्यासह अन्य काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणखी बळकट झाला असून यामुळे पक्ष संघटना वाढीस मदत होणार येत्या काळात प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटनेत योग्य ती जबाबदारी देण्यात येईल असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यावेळी म्हणाले.