संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्यातील सर्व लोकसभा निवडणुका लढवणार

पुणे : शेतकरी, कष्टकरी श्रमिक सुशिक्षित बेरोजगार तरुण, छोटे मोठे लघुउद्योग, मध्यम व्यापारी, सामान्य नागरिक यांना उध्वस्त करून संपवण्याचे काम केंद्रातील मोदी व राज्यातील फडणवीस सरकारने केले आहे. आरक्षण नोकऱ्या नवीन उद्योग व्यवसाय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव, मुलभुत विकास कामे आदी करण्यात देशातील मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. हे सरकार निष्क्रिय ठरले आहे.त्यामुळे संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्यातील ‘सर्व लोकसभा निवडणुका लढवणार असल्याचे मत संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

Loading...

यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेड’चे पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे म्हणाले,’राज्यातील ३० लोकसभा व १०० विधानसभा निवडणूक संभाजी ब्रिगेड लढवणार आहे. लोकसभा व विधानसभेच्या जागेवर महिलांना 50 टक्के जागा देऊन महिलांना जास्तीत जास्त संधी देणार आहे. ‘दारू मुक्त गाव व शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव…’ आणि १००% समाजकारण व १००% राजकारण…’ हे ब्रिद घेऊन संभाजी ब्रिगेड शेतकरी व तरुनांच्या मूलभूत प्रश्नावर रणांगणात उतरणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.  पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पत्रकार परिषदेस पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे, संभाजी ब्रिगेड’चे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष सचिन आडेकर, हवेली तालुकाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, कार्याध्यक्ष शिवाजी पवार, चित्रपट आघाडी अध्यक्ष प्रकाश धिंडले, शहर संघटक विवेक तुपे, संजय चव्हाण, मारूती चव्हाण, आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.Loading…


Loading…

Loading...