विधानसभा निवडणुकीत चुरस वाढणार, संभाजी ब्रिगेड’ विधानसभेच्या सर्व जागा लढवणार

blank

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संभाजी ब्रिगेडने मोठी घोषणा केली आहे. ‘संभाजी ब्रिगेड’ विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असून सर्व जागा लढवणार आहे. पंचवीस वर्ष दुसऱ्यांसाठी लढलो, आता स्वतःसाठी जिंकण्याकरीता निवडणुका लढणार आहोत, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांनी दिली आहे. ते पुण्यात बोलत होते.

यावेळी सौरभ खेडेकर म्हणाले की, विधानसभा उमेदवारांची पहिली यादी पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. समविचारी पक्षाबरोबर ‘संभाजी ब्रिगेड’चे वरिष्ठ नेते चर्चा करत आहे. सन्मानाने सोबत घेतले तर ठिक अन्यथा स्वतंत्र, परंतु सत्तापरीवर्तन अटळ आहे. आम्हाला सगळे पर्याय खुले आहेत.

तसेच राज्य सरकार पूरग्रस्तांना पुरेशी मदत देऊ शकलेले नाही. हजारो संसार उध्वस्त झाले, रस्त्यावर आले. मंत्री आणि सरकार सुस्त आहे. निवडणुकीमध्ये आमचा जन्म दुसऱ्यांना मोठे करण्यासाठी झालेला नाही. यावेळी मात्र आम्ही गाफील राहणार नाही. पुण्यातूनच विधानसभेवर पहिला समतेचा ‘भगवा’ झेंडा ‘संभाजी ब्रिगेड’ फडकवणार आहे, असे खेडकर म्हणाले.