भाजपवर नाराज झालेले लोक लगेच काँग्रेस-राष्ट्रवादीकडे वळतील असे नाही : सौरभ खेडेकर

पंढरपूर : भाजपा सरकारवर नाराज झालेले लोक लगेच काँग्रेस-राष्ट्रवादीकडे वळतील असे नाही असं नाही. शेतकरी, युवक, नोकरदार, व्यावसायिकांचे प्रश्न घेऊन ब्रिगेड पुढे जाणार असून आगामी विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेड १०० जागा लढवणार आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे सरचिटणीस सौरभ खेडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

संघटनात्मक बदल केल्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या संभाजी ब्रिगेडने मोठी घोषणा केली आहे. समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचा पर्याय खुला ठेवण्याचे देखील संकेत सौरभ खेडेकर यांनी दिले आहेत. संभाजी ब्रिगेड राज्यभर ५० दिवसांची रथयात्रा काढून आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

संघटना बांधणी आणि सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी खेडेकर हे दोन दिवस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत.भीमा-कोरेगाव, औरंगाबाद येथील दंगली सरकार पुरस्कृत असल्याचा देखील आरोप खेडेकर यांनी केला.

3 Comments

Click here to post a comment