मनु ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्याही एक पाऊल पुढे : संभाजी भिडे

पुणे- मनुचे गुणगान केल्यामुळे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आपल्या समाजाला गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करून हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला शिकवणारा मनु हा संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पेक्षा एक पाऊल पुढे होता असं विधान भिडे यांनी केले आहे.

काल पुण्यात दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास संभाजी भिडे यांनी जंगली महाराज मंदिरात सर्व धारकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना भिडे यांनी, आपल्या समाजाला गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करून हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला शिकवणारा मनु हा संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पेक्षा एक पाऊल पुढे होता असं विधान भिडे यांनी केलं आहे. या विधानानंतर उलटसुलट प्रतिक्रिया येवू लागल्या असून नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

भाजपाध्यक्ष अमित शहा माऊलींच्या चरणी !