भिडेंना 28 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

टीम महाराष्ट्र देशा- नाशिकमध्ये एका सभेत आंबे खाल्ल्याने मुले होत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे ऊर्फ भिडे गुरुजी यांना 28 सप्टेंबर रोजी नाशिक न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने बजावलेले आहेत. 10 जून रोजी भिडे यांची नाशिक येथे सभा झाली होती यात आंब्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने भिडे गुरुजी यांच्याविरोधात खटला दाखल केलेला आहे.

Loading...

28 सप्टेंबर यादिवशी भिडे हजर होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नसले तरी सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयाने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविला आहे. यापूर्वी भिडे यांना 31 ऑगस्ट रोजी नाशिकच्या जिल्हा न्यायालयात हजर होण्याचे आदेश बजावले होते. मात्र, या दिवशी भिडे हजर राहिले नव्हते. त्यानंतर त्यांना 28 सप्टेंबर रोजी हजर राहण्याबाबत न्यायालयाने आदेश बजावले आहेत.

बाष्कळ विदर्भाला वेगळे राज्य हवंय, पण ते वढू रायगडाला मान्य नाही – भिडे गुरुजीLoading…


Loading…

Loading...