संभाजी भिडेंच्या बैठकीदरम्यान निदर्शने, पोलिसांचा लाठीमार

sambhaji bhide guruji
 टीम महाराष्ट्र देशा- ‘शिवप्रतिष्ठान’ संघटनेचे संस्थापक  संभाजी भिडे यांच्या बैठकांना तसेच सभांना काही संघटनांचा विरोध सुरूच असल्याचं चित्र आहे. भिडे  यांनी  जालना येथे आयोजित बैठकीच्या स्थळी दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला.

 जालन्यातील आर्य समाज मंदिरात संभाजी भिडे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती.  या बैठकीला काही संघटनांनी विरोधही दर्शवला होता. आज  बैठकीच्या स्थळी या संघटनांनी निदर्शने केली.
पोलीस बंदोबस्त तोडून निदर्शक बडीसडक या भागात आर्य समाज भवनाच्या समोर पोहोचले. त्यांनी घोषणाबाजी करून अंडी फेकण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांनी   या वेळी बळाचा वापर करून निदर्शकांना पांगवले आहे. निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याचेही वृत्त आहे.