भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराचे संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे हेच सूत्रधार: प्रकाश आंबेडकर

नागरिकांना शांततेचे आव्हान

मुंबई : भीमा कोरेगाव येथे पसरलेला हिंसाचार हा नियोजित कट असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषेदेत स्पष्ट केले आहे. हिंसाचाराला मनोहर उर्फ संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे आणि घुगे हे सूत्रधार असून, त्यांच्याबाबत सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा.

bagdure

प्रकाश आंबेडकर म्हणाले, भीमा केरेगाव येथे सोमवारी येथे कोणताही प्रकार झला नसून मात्र वढू बुद्रुक येथून जवळ असलेल्या सणसवाडी येथे दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली. इमारतीवरून दगडफेक करण्यात आली. मनोहर भिडे यांच्या शिवराज प्रतिष्ठाण आणि मिलिंद एकबोटे यांच्या हिंदू एकता आघाडीतर्फे हे सर्व घडवून आणण्यात आले. त्यामुळे हा नियोजित कट असून सरकारने याप्रकरणी योग्य ती कारवाई करावी. नागरिकांनी पोलिसांना मदत करून शांतता राखावी.

You might also like
Comments
Loading...