संभाजी भिडे हे आरएसएसच्या कोअर ग्रुपमधील व्यक्ती !- प्रकाश आंबेडकर

पुणे: संभाजी भिडे हे आरएसएसच्या कोअर ग्रुपमधील व्यक्ती आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा लागल्याने ते चिडले आहेत. पी बी सावंत आणि बी जी कोळसे पाटील हे दोघे निवृत्त न्यायमूर्ती असल्याने पोलीस त्यांना हात लावू शकत नाहीत. त्यामुळे पोलीस माझ्या मागे लागले आहेत.

पोलिसांनी चौकशीला बोलावले तर पोलिसांना मी नोटीस पाठवीन आणि माझा वकिली हिसका रविंद्र कदम यांना आणि पोलिसांना दाखवेन. कोरेगाव-भीमा प्रकरणी चौकशीला लावलं तर जाणार का? असा प्रश्न विचारला असता ते बोलत होते.

पोलिसांनी आपला गाढवपणा व्यक्त केला आहे.रवींद्र कदम यांनी नियम पायदळी तुडवले. देशभरातील राजकारणी मंडळींना मीच एकत्र आणू शकतो हे भाजपला माहीत असल्याने माझ्यावर कारवाई केली जात आहे.कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे.माझ्याविरोधात पुरावा नसल्याने आता मला पंतप्रधानांना मारणाऱ्यांच्या यादीत माझं नाव टाकलं आहे. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.