संभाजी भिडे हे विद्वान; संजय राऊतांनी घेतला ‘त्या’ वक्तव्याचा समाचार

sambhaji bhide vs sanjay raut

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग फोफावत आहे. काही महिन्यांपूर्वी कोरोना आटोक्यात आल्याचं चित्र निर्माण झाल्यानंतर दैनंदिन जनजीवन सुरळीत झाले होते. मात्र, नियमांचे पालन न झाल्याने राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची स्थिती गंभीर झाली आहे. राज्यात लॉकडाऊन सारखे कडक निर्बंध देखील लावले जात आहे.

यामुळे या गंभीर स्थितीतून सावरण्यासाठी सुरक्षित अंतर पाळणे, मास्कचा काटेकोरपणे वापर करणे, हात धुणे या त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे असतानाच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मास्क लावणे म्हणजे मास्क लावण्याची गरज नसल्याचं वक्तव्य केलं आहे. यासोबतच पुढे त्यांनी अश्लाघ्य भाषेचा देखील वापर केला आहे.

याआधी देखील अनेक वादग्रस्त विधानामुळे संभाजी भिडे गुरुजींवर टीका करण्यात आल्या होत्या. तर त्यांच्याविरोधात गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे. आता, ‘केंद्र आणि राज्य शासन लोकांना उल्लू बनवत आहे. त्यांना काहीच कळत नाही. कोणत्या नालायकाने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला आहे. काही गरज नाही मास्क लावण्याची, हा सगळा मूर्खपणा आहे,’ असं वादग्रस्त भाष्य भिडेंनी केलं आहे.

त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेना खासदार व नेते संजय राऊत यांनी देखील समाचार घेतला आहे. ‘संभाजी भिडे हे विद्वान आहे. ते ज्या विचारांचे आहेत. त्या विचाराच्या पक्षातील केंद्र आणि राज्यातील अनेक नेते, मंत्र्यांना कोरोना झाला. त्यामुळे संभाजी भिडे जे बोललात ते तथ्य ही असेल,’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :