fbpx

राज्य कुटुंब कल्याण विभागामार्फत संभाजी भिडेंच्या चौकशीचे आदेश

sambhaji bhide

नाशिक : आरोग्य संचलनालयाकडून नाशिक महापालिकेला पत्र मिळाल्याने मनपाच्या वैद्यकीय विभागाकडून भिडेंची चौकशी केली जाणार आहे.  नाशिक महापालिकेनं संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानाची दखल घेतली आहे.

राज्य कुटुंब कल्याण विभागामार्फत नाशिक महापालिकेला बुधवारी पत्र पाठवण्यात आलं यामध्ये मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी त्यांच्या शेतातील आंबा खाल्ल्याने मुलं होतात, या वक्तव्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच तथ्य आढळल्यास आढळल्यास पीसीपीएनडीटी अक्टनुसार भिडेंवर कारवाई करण्याच्या सूचनाही करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी नाशिक महापालिकेला हे पत्र पाठवलं आहे.

काय म्हणाले होते संभाजी भिडे ?

लग्न होऊन 10 – 15 वर्ष झालेल्यांनाही पोर होत नाही, अशा स्त्री-पुरुषांनी, पती पत्नींनी ती फळं खाल्ली, तर निश्चित पोर होईल. रोज आंबे आणून, माझ्याही बागेत, शेतात ते लावले. मी आता तुम्हाला सोडलं तर माझ्या आईशिवाय कोणाला सांगितलं नाही, ते आंबे कसे आहेत. मी आतापर्यंत 180 पेक्षा जास्त जणांना, पती-पत्नींना, जोडप्यांना खायला दिलेत आणि 150 पेक्षा जास्त जणांना मुलं झाली. ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल. अपत्य नसेल तर होते. म्हणजे त्याचा अर्थ नपुंसकत्वावर तोडगा आणि वंध्यत्वावरचा ताकद देणारा तो आंबा आहे.