कोरोनाबळींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भिडेंनी याआधी आमदारालाही मास्क काढायला लावला होता

sambhaji bhide

सांगली – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात सातत्याने वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली आहे.त्यात काही ठिकाणी वाढत्या रुग्णांना आरोग्य सेवा पुरवताना शासन आणि प्रशानसनावर प्रचंड ताण येत आहे. सरकारी यंत्रणा हतबल ठरत आहेत. वाढत्या मृत्यूदराबरोबरच भीतीही वाढत आहे.

अवघे जग या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हैराण झाले असतानाच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे हे कधी वादग्रस्त कृती करून तर कधी वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहिलेले आपणास पाहायला मिळाले आहे.संभाजी भिडे यांनी याआधी एका कार्यक्रमात चक्क आमदारालाच मास्क काढायला लावला होता.त्यावेळी देखील मोठा वाद निर्माण झाला होता.

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आळसंद गावामध्ये एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमात संभाजी भिडे उपस्थित होते. यावेळी संभाजी भिडे यांनी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना उद्धाटनाआधी तोंडावरील मास्क काढायला लावला होता.विशेष म्हणजे कोरोना होत नाही मास्क काढा असं भिडे यांनी सांगितल्यावर बाबर यांनीदेखील मास्क काढून टाकला होता.भिडे यांनी केलेल्या या कृतीमुळे त्यावेळी त्यांच्यावर बरीच टीका झाली होती.

दरम्यान, हा वाद मिटतो न मिटतो तोच कोरानाची साथ आणि कोरोनाबळींबाबत आज भिडे यांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. कोरोना हा आजारच नाही. तो मानसिक रोग आहे. कोरोनाने माणसे मरतात, ती जगण्याच्या लायक नसतात, असे वादग्रस्त विधान संभाजीराव भिडे यांनी आज येथे केले आहे. सांगली जिल्ह्यात लॉकडाऊनच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चात भिडे सहभागी झाले होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली.

ते म्हणाले, ‘केंद्र आणि राज्य शासन लोकांना उल्लू बनवत आहे. त्यांना काहीच कळत नाही. मास्क लावायची गरज आहे का? एकीकडे दारू सुरु आहे, लोक गांजा ओढत आहेत. अफू सुरु आहे, मग मास्कने काय होणार आहे? मुळात कोरोना अस्तित्वात आहे का, हा प्रश्न महत्वाचा आहे. तो मानसिक आजार आहे. लॉकडाऊनचा निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारला अजिबात अक्कल नाही’ असं म्हणत सरकारवर देखील तोफ डागली.

महत्वाच्या बातम्या