उदयनराजेंची अटक खपवून घेणार नाही

संपूर्ण महाराष्ट्रभर पेटून उठू आणि रस्त्यावर येऊ - भिडे गुरुजीं

वेबटीम: खासदार उदयनराजे भोसले यांना खंडणी प्रकरणात न्यायलयाने अटकपूर्व जमीन नाकरल्यानंतर आता राज्यातील अनेक नेते उदयनराजेच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याच दिसत आहे. राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उदयनराजेंना पाठिंबा दिला आहे.

bagdure

आता उदयनराजे यांना पोलिसांनी अटक करण्यासाठी चालवलेले प्रयत्न थांबवावेत, राजेंची  अटक आम्ही कधीच खपवून घेणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रभर पेटून उठू आणि रस्त्यावर येऊ.” असा इशारा संभाजी भिडे गुरुजी यांनी दिला आहे. या बाबतच वृत्त एबीपी माझा वाहिनीने दिले आहे.

उदयनराजेंवर केलेले आरोप घाणेरडे असून  मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी हि भिडे गुरुजी यांनी केली आहे . तसेच उदयनराजे असं वागतील यावर परमेश्वरही विश्वास ठेवणार नाही. त्यांना अटक झाली तर महाराष्ट्र शासनाकडून खुप मोठं पाप होईल त्यामुळे त्यांनी ते करु नये. असही भिडे गुरुजी म्हणाले आहेत.

 

You might also like
Comments
Loading...