सर्वधर्म समभाव म्हणजे थोतांड; भिडे गुरुजींकडून मनुस्मृतीच जाहीर समर्थन

टीम महाराष्ट्र देशा: सर्वधर्म समभाव धर्मनिरपेक्षता हे सर्व थोतांड असल्याच वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे गुरुजींनी केले आहे, तसेच मनुस्मृतीच जाहीर समर्थन करताना मनूने जगाला पहिली घटना दिली असून त्याच्या सावलीजवळ जाण्याची आपली लायकी नसल्याचं त्यांनी म्हंटल आहे. धुळ्यातील सैनिक भवनामध्ये आयोजित सभेत ते बोलत होते.

मनुवर टीका केल्याने अनेकांना आनंद होतो, मात्र मनुस्मृतीचे म्हणजे मानवधर्मशास्त्र आहे. आज मनूवर टीका केल्याने अनेकांना आनंद मिळतो. तसेच निधर्मीपणा हा नालायकपणा असल्याच त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, जळगाव येथे आयोजित सभेत हिंदू स्त्री-पुरुष राष्ट्रीयतेबाबत नपुंसक असल्याचं विधान भिडे गुरुजींनी केले आहे. हिंदूना स्वार्थापलीकडे काही कळत नाही. ही उणीव दूर केल्याशिवाय आपण राष्ट्र म्हणून उभे राहू शकणार नसल्याचही ते म्हणाले.

You might also like
Comments
Loading...