fbpx

भिडे गुरुजींची भेट घेण्यासाठी आमदाराने थांबवली एसटी

टीम महाराष्ट्र देशा : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची भेट घेण्यासाठी आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि नुकतेच भाजपवासी झालेले आमदार नरेंद्र पाटील यांनी सांगलीत वाटेतच एसटी बस अडविली. बसमध्येच भिडेंची भेट घेऊन दहा मिनिटे चर्चा केली आणि प्रवाशांची माफी मागून त्यांनी निरोप घेतला.

नरेंद्र पाटील सोमवारी सांगली जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितिन चौगुले यांच्याशी संपर्क साधला. भिडे यांना भेटण्यासाठी येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी चौगुले यांनी संभाजी भिडे बसमधून बाहेरगावी जात असल्याचे सांगितले. नरेंद्र पाटील यांनी कोणत्या मार्गाने बस जात आहे, याबाबत विचारणा केली. त्यानंतर सांगली-मिरज रस्त्यावरून जाणाऱ्या या बसचा क्रमांक घेऊन कर्मवीर भाऊराव पाटील चौकात बस थांबविण्याची विनंती त्यांनी केली. चालकानेही शासकीय वाहनांचा ताफा व नरेंद्र पाटील यांच्या विनंतीवरून बस थांबविली.

जवळपास दहा मिनिटांच्या या भेटीनंतर आमदार पाटील यांनी प्रवाशांची दिलगिरी व्यक्त केली. चालक व वाहकांचे आभार मानून त्यांनी निरोप घेतला. प्रवाशांनीही या भेटीबाबत आणि त्यामुळे ताटकळत राहिल्याबद्दल कोणतीही तक्रार केली नाही.

आलिशान कारमधून फिरणारे उदयनराजे जेव्हा डंपर चालवतात…

संभाजी भिडेंना मुख्यमंत्री पाठिशी घालत आहेत – विदयाताई चव्हाण

1 Comment

Click here to post a comment