अहमदनगर : कडेकोट पोलीस बंदोबस्तात भिडे गुरुजींच्या सभेला सुरुवात

अहमदनगर : श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या ‘संकल्प सुवर्ण सिंहासनाचा जागर हिंदुत्वाचा’ या उपक्रमांतर्गत नगरमधील पटेल मंगल कार्यालयात सभेला सुरुवात झाली असून, या सभेला आरपीआय व इतर संघटनांचा विरोध असल्यामुळे या ठिकाणी  कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

दरम्यान या सभेमध्ये बोलताना गुरुजींनी शिवाजी महाराजांसाठीच्या 3२ मण सुवर्ण सिंहासनाचा निर्धार व्यक्त केला असून, या सुवर्ण सिंहासनासाठी लागणारा निधी गोळा करण्याचे काम दोन हजार धारकऱ्यांनी सुरु केलं असल्याचंही त्यांनी सांगितले. जर या कार्यासाठी सरकारने मदत केली तर त्या मदतीचा आपण स्वीकार करणार नसल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.