संभाजी भिडे गुरुजींनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; भेटीचे कारण गुलदस्त्यात

संभाजी भिडे

महाबळेश्वर – शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. कधी वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते चर्चेत येतात तर कधी वादग्रस्त कृती केल्याने ते चर्चेत असतात. आज पुन्हा एकदा भिडे गुरुजी चर्चेत आले आहेत.

संभाजी भिडे यांनी आज शिवसेनेचे नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या दरे (ता.महाबळेश्वर) या गावी जाऊन भेट घेतली. याविषयी भिडे गुरुजी यांना विचारले असता त्यांनी भेटीचे कारण सांगण्याचे टाळले. सुमारे तासभर दोघांत बंद खोलीत चर्चा झाली. या चर्चेत नेमके काय मुद्दे होते, याबद्दल आता जोरदार उलटसुलट चर्चा होत आहे.

नुकतीच काल खासदार उदयनराजेंनी बोटीतून जाऊन मंत्री शिंदे यांची भेट घेतली होती. यानंतर आज भिडे गुरुजी यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही सदिच्छा भेट होती, असे स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या