भिडे गुरुजींच्या आज नगरमध्ये होणाऱ्या सभेला आंबेडकरवादी संघटनांचा विरोध

अहमदनगर : श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांची आज सकाळी १० वाजता नगरमध्ये सभा होणार आहे. मात्र या सभेला आंबेडकरवादी संघटनांनी विरोध दर्शवला असून, या सभेवर ‘एल्गार मोर्चा’ नेण्याचा इशारा दिला आहे. संभाजी भिडे हे कोरेगाव भीमा दंगलीतील मुख्य आरोपी आहेत. तसेच त्यांच्याकडून सभेत समाजामध्ये फुट पाडणारे भाषण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या सभेला परवानगी देऊ नये असं आंबेडकरवादी संघटनांचं म्हणनं आहे.

bagdure

दरम्यान भिडे यांची सभा व एल्गार मोर्चा या दोन्हीला पोलिसांनी काल रात्री उशिरापर्यंत परवानगी दिलेली नसली, तरी या पार्श्वभूमीवर व कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सभेच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. सभेला विरोध करण्यासाठी आंबेडकरवादी संघटनांनी गेल्या दोन दिवसांपासून नगरमध्ये आंदोलने सुरू केली आहेत.

You might also like
Comments
Loading...