बाष्कळ विदर्भाला वेगळे राज्य हवंय, पण ते वढू रायगडाला मान्य नाही – भिडे गुरुजी

पुणे : बाष्कळ विदर्भाला वेगळे राज्य हवंय पण ते वढू रायगडाला मान्य नसल्याचे म्हणत संभाजी भिडे गुरुजी यांना वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणी वादात उडी घेतली आहे. पुण्यामध्ये संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्याच आगमन होणार आहे, यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून भक्ती-शक्ती संगमासाठी शेकडो धारकरी शिवाजीनगर भागात दाखल झाले आहेत. यावेळी भिडे गुरुजी संबोधित करत होते.

दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांंच पुण्यात आगमन झाल आहे. त्या पालखी सोहळ्यात संभाजी भिडेसुद्धा सहभागी होणार आहेत. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे पुण्यात दाखल झाले आहेत. संचेती पुलापासून ते वारीत सहभागी होण्याची शक्यता आहे. परंतु पोलिसांनी संभाजी भिडेंना पालखी सोहळ्यात सहभागी होऊ नये, यासाठी नोटीस बजावली आहे. मात्र भक्ती-शक्ती संगम करण्यासाठी संभाजी भिडे यांच्याबरोबर त्यांचे शेकडो अनुयायीही वारीत सहभागी होण्यावर ठाम आहेत.