fbpx

पूरपरिस्थितीवर बोलताना संभाजी भिडे यांना अश्रू अनावर

टीम महाराष्ट्र देशा : सतत पडणाऱ्या पावसामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांना पूर आल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले. महापुराच्या थैमानाचा आज 9वा दिवस आहे. कोल्हापूर – सांगली आलेल्या महापुरामुळे दोन्ही जिल्ह्यात हलाकीची परिस्थिती आहे.

आज सांगलीमधील हंडेपाटील तालीम रोडमध्ये शिवप्रतिष्ठान आणि त्यांचे संस्थापन संभाजी भिडे यांनी भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी निसर्गाच्या आपत्तीला आधुनिकीकरण जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर संपूर्ण परिस्थितीवर बोलताना संभाजी भिडे यांना अश्रू अनावर झाले आहे.

तसेच सांगली आणि कोल्हापुरात कमी वेळात अतिप्रचंड पाऊस झाला. त्या अतिवृष्टीने महापूर आला. त्या महासंकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना शासन प्रशासन आणि स्थानिक शेजारील गावकरी मदत करीत आहेत. महाराष्ट्रातील सर्व जण माणुसकीचे हात पुढे करीत असून पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त जिल्ह्यांमधल्या कुटुंबांना रोखीने पाच हजार रुपये अर्थसहाय्य तातडीनं वितरीत करावं, तसंच उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या