माझ्या बागेतील आंबे खाल्यावर मुलं होतात; अजब वक्तव्याने भिडे गुरुजी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

पुणे: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसत आहेत. यावेळी कारण आहे ते त्यांच्या बागेतील आंब्याचं. भिडे गुरुजी यांनी काल नाशिक येथे बोलताना ‘माझ्या बागेतील आंबे खाल्यावर मुलं होतात’ असा अजब दावा केला आहे. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यामुळे ते अंधश्रध्दा वाढवत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Loading...

कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संभाजी भिडे हे वादात सापडले होते. ही दंगल घडवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान, आता नाशिक येथे बोलताना भिडे यांनी केलेल्या अजब वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून भिडे गुरुजींच्या विधानावर आक्षेप घेण्यात आला असून, चमत्काराचा दावा करणं हे राज्यातील अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा असल्याचं अंनिसचे मिलिंद देशमुख यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले की, ही सर्व शिकलेली मंडळी आहेत तरीही त्यांच्याकडून अवैज्ञानिक गोष्टी बोलल्या जात आहेत. भिडे गुरुजींनी केलेल्या विधानाचा विचार धारकऱ्यानीही करायला हवा की हे आपल्याला कुठे घेऊन जात आहेत.

 नेमकं काय म्हणाले होते संभाजी भिडे

लग्न होऊन 10 – 15 वर्ष झालेल्यांनाही पोर होत नाही, अशा स्त्री-पुरुषांनी, पती पत्नींनी ती फळं खाल्ली, तर निश्चित पोर होईल. रोज आंबे आणून, माझ्याही बागेत, शेतात ते लावले. मी आता तुम्हाला सोडलं तर माझ्या आईशिवाय कोणाला सांगितलं नाही, ते आंबे कसे आहेत. मी आतापर्यंत 180 पेक्षा जास्त जणांना, पती-पत्नींना, जोडप्यांना खायला दिलेत आणि 150 पेक्षा जास्त जणांना मुलं झाली. ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल. अपत्य नसेल तर होते. म्हणजे त्याचा अर्थ नपुंसकत्वावर तोडगा आणि वंध्यत्वावरचा ताकद देणारा तो आंबा आहे.

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...