Video: सरकारचे सासरे संभाजी भिडेंना अटक का होत नाही- जितेंद्र आव्हाड

मुंबई:  मिलिंद एकबोटे यांना अंतरीम जमीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी आरोप असलेले एकबोटे यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टातून मिलिंद एकबोटे सुटेल यासाठी सरकार आशावादी होते. पण, सुप्रीम कोर्टाने झटका दिल्यानंतर मिलिंद एकबोटेला अटक झाली. अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, सुप्रीम कोर्टातून मिलिंद एकबोटे सुटतो का, यासाठी सरकार आशावादी होते. पण, सुप्रीम कोर्टाने झटका दिल्यानंतर मिलिंद एकबोटेला अटक झाली. पण, सरकार मनोहर भिडे बद्दल अवाक्षरही काढायला तयार नाही… का ? याचे उत्तर महाराष्ट्राला हवय.

कोरेगाव-भीमा दंगल भडकवण्यासाठी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे हे सरकारचे हस्तक होते. असा आरोप हि त्यांनी केला आहे. तसेच मिरजेच्या दंगलीचे आरोपी, जोधा अकबर च्या दंगलीचे आरोपी असूनही संभाजी भिडे याचं नाव पद्मश्री साठी गृहीत धरण्यात येत. सरकारचे सासरे संभाजी भिडे यांना सरकार अटक का करत नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

पहा काय म्हणाले जितेंद्र आव्हाड