संभाजी पाटील निलंगेकर म्हणतात… ‘हमें तो अपनों ने ही लूटा, गैरों में कहाँ दम था’

Sambhaji-Patil-Nilangekar

टीम महाराष्ट्र देशा : लातूर महापालिकेत भाजपचे बहुमत असताना सुद्धा महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने फोडाफोडीचे राजकारण केल्याने भाजपचे नेते आणि माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

यासंदर्भा त्यांनी एक व्हीडीओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. यात त्यांनी काँग्रेसवर कडक शब्दात टिका केली आहे. `हमे तो अपनोंने लुटा…गैरों में कहा दम था….मेरी कश्ती थी डुबी जहाँ पाणी कम था…` असे म्हणत त्यांनी पक्षाशी गद्दारी करणाऱ्या नगरसेवकांवर टीका केली.

परस्थितीला सामोरे जाणारा मी कार्यकर्ता आहे. राजकीय क्षेत्रात काम करत असताना असे प्रसंग येत असतात. आजची महापौरपदाची निवडणूक ही लोकशाही खून आहे. घोडेबाजार म्हणतात ते पैशाच्या बळावर काही लोकांना त्यांनी सोबत घेतले. लातूरच्या राजकीय घडामोडीवर बरेच बोलायचे आहे. पण सध्या वेट ॲण्ड वॉच चालू आहे. अनेक गोष्टी समोर आल्या आहेत, त्या अनपेक्षीत आहेत. माझ्यासोबतच कार्यकर्त्यांच्या समोरही या गोष्टी आल्या आहेत. भाजपचा कार्यकर्ता हा मैदानात असणारा कार्यकर्ता आहे. मैदाना सोडून जाणारा कार्यकर्ता नाही.

आपल्याच माणासाकडून असे घडले की वेदना होतात. भविष्यात आत्मपरिक्षण करु. कमी पडलो तेथे भरून काढू. सर्वांना सोबत घेवून काम करण्यात येईल. राज्यात राजकीय वातावरणाकडे सर्व जण लक्ष ठेवून आहेत. जनादेशाच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून होत आहे. तसाच प्रयत्न लातूरमध्ये झाला आहे.

जनतेला गृहित धरून चालता यते नाही. हे सर्व जनता पाहत आहे. लातूर महापौर निवडणुकीच्या बाबतीत `हमे तो अपनोंने लुटा…गैरों में कहा दम था….मेरी कश्ती थी डुबी जहाँ पाणी कम था…` असे म्हणतच त्यांनी पक्षाशी गद्दारी करणाऱ्या नगरसेवकांवर टीका केली.

महत्वाच्या बातम्या