Share

Uddhav Thackeray | ठाकरे गटाची ‘मशाल’ धोक्यात; दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई : अंधेरी (पूर्व) पोट निवडणुकीसाठी (Election) निवडणूक आयोगाने पोट उद्धव ठाकरे गटाला स्वतंत्र चिन्ह (मशाल) आणि नावं (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिल आहे. परंतू 1994 सालापासून मशाल हे आमच्या पक्षाचे चिन्ह आहे, असा दावा दिवंगत नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टी ने (Samta Party) आयोगाने दिलेल्या ‘मशाल’ चिन्हावर केला आहे. अशातच समता पार्टीकडून उद्धव ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) ‘मशाल’चिन्हाला आव्हान (Challenge) देण्यात आलं आहे.

‘मशाल’ चिन्हाविरोधात न्यायालयाच याचिका दाखल

उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या ‘मशाल’ चिन्हाविरोधात दिल्लीच्या उच्च न्यायालयात समता पार्टीने एक याचिका दाखल केली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ठाकरे गटाच्या अडचणींमध्ये आणखिन वाढ झाली असल्याचं दिसून येत आहे. ही याचिका समता पार्टीचे अध्यक्ष उदय मंडल (Uday Mandal) यांनी उच्च न्यायालयात (High Court) दाखल केली आहे. त्यावेळी उदय मंडल यांनी सांगितले की, अंधेरी (पूर्व) पोटनिवडणुकीमध्ये आमच्या पक्षाचा उमेदवारही निवडणुक लढवणार होता. परंतू निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘मशाल’चिन्ह दिल्याने आमच्या उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही.

तसेच, समता पक्षाचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या तृणेश देवळेकर यांनीही उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळालेल्या ‘मशाल’ चिन्हावरून भाष्य केलं होतं. 1994 सालापासून हे राष्ट्रीयकृत चिन्ह आमच्या पक्षाचं असल्याचा दावा यासंदर्भात पक्षाने निवडणूक आयोगाला ईमेलच्या माध्यमातून माहिती कळवली असून हे चिन्ह आम्हाला देण्यात यावं अशी मागणी तृणेश देवळेकर यांनी केलीय. इतकेच नाही तर या चिन्हासाठी थेट न्यायालयामध्ये जाण्याचा इशाराही समता पार्टीने दिला असल्याचं समजतं आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या अडचणी एक संपली की दुसरी उभी राहत आहे. प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालयात जावं लागत असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे ठाकरे गटाला या पोटनिवडणुकीसाठी खूपच संघर्ष करावा लागत आहे. त्यांचा हा संघर्ष पोटनिवडणुकीत दिसून येणार का?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : अंधेरी (पूर्व) पोट निवडणुकीसाठी (Election) निवडणूक आयोगाने पोट उद्धव ठाकरे गटाला स्वतंत्र चिन्ह (मशाल) आणि नावं (शिवसेना उद्धव …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics