श्रीक्षेत्र देवगड येथे समर्थ सद्गुरू किसनगिरीबाबा पुण्यतिथी महोत्सव

नेवासा: श्रीक्षेत्र देवगड याठिकाणी समर्थ सद्गुरू किसनगिरीबाबा पुण्यतिथी महोत्सव संपन्न होत आहे. या किसनगिरीबाबा पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्र देवगड या ठिकाणी महाविष्णूयाग अखंड हरिनाम सप्ताह व तसेच श्री किसनगिरी विजय ग्रंथाचे पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच यावेळी महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. यामध्ये तुकाराम महाराज सखारामपुरकर, नारायण महाराज सावखेडा, अरुनगिरी महाराज भामठांन, कैलासगिरी महाराज सावखेडा, दिनकर महाराज शेवगाव यांचे कीर्तन होणार आहे. आणि श्री ह.भ.प. गुरुवर्य भास्करगिरी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान, यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे.