समानता एक्सप्रेस: IRCTCची नवी पर्यटन एक्सप्रेस

‘टीम महाराष्ट्र देशा : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, ‘समानता एक्सप्रेस’ नावाची नवी पर्यटन एक्सप्रेस आपला पहिला प्रवास नागपूर येथून दिनांक 14 एप्रिल 2019 रोजी सुरू करणार आहे.‘समानता’ या एक्सप्रेसचे संचलन इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) करणार असून डॉ. बाबासाहेबांचे जन्मस्थान असलेल्या मध्यप्रदेशाच्या इंदोर येथील ‘महू’पासून ते भगवान गौतम बुद्धांचा जन्म झालेल्या नेपाळच्या लुंबिनीपर्यंत या एक्सप्रेसचा प्रवास होणार आहे.

Loading...

चैत्यभूमी (मुंबई), महोव (इंदौर), बोधगया (गया), सारनाथ (वाराणसी), लुंबिनी (नौटनवा), कुशीनगर (गोरखपूर), दीक्षाभूमी (नागपूर) या सर्व ठिकाणी ही ट्रेन भेट देणार आहे. त्यामुळे नागपूरपासून एक्सप्रेसचा प्रवास सुरू होणार आहे. या ट्रेनचा प्रवास नागपूर-मुंबई(दादर)-इंदोर-गया-गोरखपूर-वाराणसी-नागपूर असा असणार आहे.

या पर्यटन एक्सप्रेसचे तिकीट प्रत्येक प्रवाशामागे 11,340 रुपये इतके असणार आहे. IRCTC च्या संकेतस्थळावरून तसेच प्रवासी आरक्षण केंद्रातूनही एक्सप्रेसचे आरक्षण करता येणार आहे. या एक्सप्रेसचा प्रवास 12 दिवसांचा असणार असून रेल्वे, रस्तेमार्ग, बसमधून प्रेक्षणीय स्थळांना भेट, धर्मशाळांमध्ये निवास असे समानता एक्सप्रेसच्या पर्यटनाचे स्वरूप असणार आहे.Loading…


Loading…

Loading...