समांथाने लग्नाची ‘ती’ साडी नागा चैतन्यच्या कुटुंबाला केली परत…

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ सतत शेअर करत असते. समांथा ही गेल्या काही दिवसांपासून पुष्पा या चित्रपटातील तिच्या आयटम सॉंगमुळे चर्चेत होती. पण त्या आधी समांथा ही तिच्या आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटामुळे चर्चेत होती. समांथा आणि नागा चैतन्य यांनी २०१७ मध्ये गोव्यात लग्न केले होते. या जोडीचे सुंदर नाते जगासमोर आले, पण अचानक कोणाची दृष्ट लागली आणि समांथा आणि नागा मध्ये दुरावा आला आणि थेट घटस्फोटापर्यंत ही जोडी धडली आणि चाहत्याना धक्काच बसला.

त्यानंतर अचानक समांथाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नागा चैतन्यचं आडनाव काढून टाकलं. एवढचं काय तर त्या दोघांनी एक दिवस सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घटस्फोट झाल्याचे सांगितले. त्यानंतर आता चर्चा सुरु झाली आहे ती म्हणजे, समांथाने तिची लग्नाची साडी नागा चैतन्यच्या कुटुंबाला परत केली

समांथाला घटस्फोटानंतर नागा चैतन्य आणि त्याच्या कुटुंबाने २०० कोटी रुपयांची पोटगी देऊ केली होती. पण, समांथाने पोटगी घेण्यास नकार दिला आणि नागा किंवा त्याच्या कुटुंबाकडून एक रुपयाही घ्यायचा नाही असं सांगितल.

महत्वाच्या बातम्या :