fbpx

“सामंत गोयल ‘RAW’चे प्रमुख तर ‘IB’च्या प्रमुखपदी अरविंद कुमार” 

पुन्हा सत्तेत आलेल्या मोदी सरकारने बुधवारी देशाच्या गुप्तचर विभागात नवी नियुक्ती केली आहे. सरकारने १९८४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अरविंद कुमार यांची इंटेलिजेंस ब्युरो (आयबी) तर १९८४च्या बॅचचे आयपीएस अधिकारी सामंत गोयल यांची ‘रॉ’ प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदीच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने त्यांच्या नावाला परवानगी दिली आहे. अरविंद कुमार यांना काश्मीरमधील विविध प्रकरणाबाबत माहिती असल्याचे मानले जाते. ते आताच्या आयबी चीफ राजीव जैन यांची जागी पदभार स्वीकारतील. तर गोयल हे सध्याचे रॉ प्रमुख अनिल कुमार धस्माना यांच्या जागी पदभार स्वीकारतील.
 गोयल यांंनी पाकिस्तानविरोधात २०१६ च्या उरी हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइक आणि २०१९ मध्ये पाकिस्तानातील बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राइकमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे.