ब्राह्मण मतदारांना आकर्षित करण्यासाठी समाजवादी पार्टी उभारणार १०८ फूट उंचीचा परशुरामाचा पुतळा

bhagwan parshuram

लखनौ – ब्राह्मण मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेशमधील सर्वच राजकीय पक्ष करत आहेत. उत्तर प्रदेशातील ब्राह्मण वर्गाच्या व्होट बँकेचा विचार करून परशुरामाचा पुतळा उभा करण्याची तयारी समाजवादी पक्षाने केली आहे.

उत्तर प्रदेशात ब्राह्मणांचा सन्मान वाढवण्यासाठी भगवान परशुरामाचा भव्य मूर्ती उभारण्याची घोषणा पक्षातर्फे करण्यात आली आहे. या मूर्तीची उंची १०८ फूट असेल तसेच तिची स्थापना उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये उभारण्यात येईल.

मूर्ती उभारण्याच्या तयारीस समाजवादी पक्षाकडून सुरुवात झाली आहे. तसेच त्यासाठी सपाचे नेते जयपूर येथे पोहोचले आहेत. परशुरामा चेतना ट्रस्टच्याअंतर्गत ही मूर्ती स्थापन केली जाईल.मूर्ती उभारण्यासाठी देशातील नामांकित मूर्तीकार अर्जुन प्रजापती आणि अटल बिहारी वाजपेयींची प्रतिमा निर्माण करणाऱ्या राजकुमार यांच्याशी चर्चा सुरू आहे.

उत्तर प्रदेशात ब्राम्हण मतदारांची संख्या लक्षणीय आहे. हे मतदार निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता सर्वच राजकीय वाटत असते यामुळेच गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात ब्राह्मण व्होटबँकेच्या राजकारणाने जोर पकडला आहे.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

… म्हणून होतेय एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची जोरदार मागणी

मोठी बातमी: इंदुरीकर महाराजांची आज कोर्टात महत्वाची सुनावणी

महावितरणचा प्रताप : एकनाथ खडसेंना पाठवलं १ लाख ४ हजार रुपयांचं वीज बिल