टीम महाराष्ट्र देशा: ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या टी 20 विश्वचषक (T20 World Cup) चा आज समारोप झाला. हा ऐतिहासिक सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर संपन्न झाला आहे. टी 20 विश्वचषक सामन्यांमध्ये पाकिस्तान (Pakisthan) आणि इंग्लंड (England) हे दोन संघ उतरले होते. दरम्यान, इंग्लंडने पाकिस्तानला 5 गडी राखून पराभूत करत टी 20 विश्वचषकाचा सामना आपल्या नावावर केला. सामना सुरू होण्यापूर्वी इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडला 138 धावांचे लक्ष दिले होते.
दरम्यान, इंग्लंड संघातील गोलंदाज सॅम करनने पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिजवानला बाद करून एक विक्रम केला आहे. पाकिस्तान संघाचे सलामी वीर मोहम्मद रिजवान आणि बाबर आझम यांनी अंतिम सामन्यात आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. पण पाचव्या षटकामध्ये सॅम करनने ही जोडी तोडली. रिजवान 15 चेंडू मध्ये 14 धावा करून बाद झाला. रिजवान बाद होताच सॅम करन टी 20 विश्वचषकात इंग्लंड संघाकडून सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर या सामन्यामध्ये सॅम करनने शान मसूद आणि मोहम्मद नावाजला देखील आऊट केले.
आज झालेल्या टी 20 विश्वचषक सामन्यांमध्ये इंग्लंडचा गोलंदाज सॅम करन टी-20 विश्वचषकात इंग्लंडकडून सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज बनला आहे. सॅम करनने या विश्वचषक स्पर्धेमध्ये 13 विकेट्स घेतले आहेत. याआधी इंग्लंडच्या रायन साइडरबॅटमनने टी 20 विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेतले होते. दरम्यान, आज सॅम करनने त्याचा विक्रम मोडून नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवला आहे.
Brilliant spell of fast bowling by Sam Curran 🔥#T20WorldCupFinal | #PAKvENG | 📝 https://t.co/HdpneOrcyQ pic.twitter.com/ong0xA6DCZ
— ICC (@ICC) November 13, 2022
पाकिस्तानचा निम्मा संघ बॅद झाल्यानंतर सॅम करन आणि ख्रिस जॉर्डनने उरलेल्या पाकिस्तान संघाला एका पाठोपाठ एक पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सॅम करनने 4 षटकात 12 धावा देत 3 विकेट घेतल्या. तर ख्रिस जॉर्डनने 2 विकेट टिपल्या. अखेर पाकिस्तानला 20 षटकात 8 बाद 137 धावांपर्यंतच पोहोचता आले.
महत्वाच्या बातम्या
- Umesh Patil on Rajan Patil | “पोरांच्या नावाने बापाच बिल फडतो” ; उमेश पाटलांची राजन पाटलांवर टीका
- Ram Kadam | “उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं ऐकलं नाही…”, राम कदम यांचा घणाघात
- Eknath Khadse | “तुमच्यात हिम्मत असेल तेवढे…” ; एकनाथ खडसेंचे गिरीश महाजन यांना आव्हान
- T20 World Cup | टी 20 विश्वचषक 2022 चे जेतेपद इंग्लंडकडे, पाकिस्तानवर 5 विकेट राखून विजय
- Chandrashekhar Bawankule | “उद्धव ठाकरे यांना आमदार सोडून जाऊ शकतात, मग उद्योजक…”; बावनकुळेंचा खोचक सवाल