करकरेंच्या बलिदानाला सलाम ,विरोधकांनो राजकारण करु नका : भाजप

टीम महाराष्ट्र देशा- मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी राहिलेल्या आणि सध्या मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभेच्या जागेवरील भाजपच्या उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मुंबई हल्ल्यातील शहीद एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याबाबतीत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यां साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर ही हेमंत करकरे विषयी बोलताना म्हणाल्या की, मी हेमंत करकरे यांना तुझा सर्वनाश होईल असा शाप दिला होता आणि २१ दिवसातच मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. असे तथ्यहीन वक्तव्य केल्याने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या वर टीका होत आहे.

दरम्यान,भाजपचे नेते आणि प्रवक्ते नलिन कोहली यांनी प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्यापासून अंग झटकण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले,जे देशासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येकाचा आदर राखला पाहिजे. प्रज्ञा ठाकूर जे म्हटल्या तो त्यांचा दृष्टीकोन असू शकतो, कारण त्यांना तपासातून जावे लागले होते. आम्ही करकरेंच्या बलिदानाला सलाम करतो. यात राजकारण करु नये असं म्हटलं आहे.