सलमानच्या आगामी ‘टायगर झिंदा है’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

सलमान व कतरिनाच्या एकत्र केमिस्ट्रीची झलक चाहत्यांना पाहायला मिळणार

टीम महाराष्ट्र देशा: सलमान खानच्या आगामी ‘टायगर झिंदा है’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला. या ट्रेलरमध्ये सलमान खान आणि कतरिना कैफचा एक वेगळाच अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. ट्रेलर बघताना हॉलिवूड चित्रपटातील स्टंट्स बघत असल्यासारखे वाटेल. इराक शहरात इसिस या दहशतवादी संघटनेने २५ हिंदुस्थानी परिचारिकांचे अपहरण केले असून, त्यांची सुटका करण्याची जबाबदारी सलमान खान म्हणजेच टायगरवर असते. सलमान त्या परिचारिकांची सुटका कशी करतो आणि इसिसशीच्या दहशतवाद्यांशी कसा लढा देतो हे बघण्यासारखे आहे. ब्रेक अप च्या चर्चेनंतर पहिल्यांदाच सलमान आणि कतरिना एकत्र काम करत आहेत त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे

bagdure

पहा टायगर झिंदा है’ चा ट्रेलर

 

 

 

You might also like
Comments
Loading...