जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमानच्या सुरक्षेत केली वाढ

सलमान खान

मुंबई : अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिलीय. गोरेगावच्या सेटवर जाऊन काही तरुणांनी सलमानला धमकावल्याच समोर आल आहे. राजस्थानच्या एका गँगरस्टनं सलमानला धमकावल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. एवढचं नव्हे तर त्याच्या सुरक्षा रक्षकांनाही संरक्षण देण्यात आलंय. रेस-3 चे शुटिंग सुरू असताना हा प्रकार घडला. त्यामुळं या चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलंय.

सलमान खाननं एकटं फिरू नये असा सल्ला मुंबई पोलिसांनी दिलाय. सलमानला थेट समोर येऊन जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ माजली आहे.