सलमानचा ‘राधे’ला आयएमडीबी वर मिळाली ‘एवढी’ रेटिंग

मुंबई : बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘राधे’ हा १३ मे रोजी ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित झाला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित न होता डिजीटल प्लॅटफॉर्म झी-फाईव्ह आणि झी-फ्लेक्स वर प्रदर्शित झाला. मात्र हा चित्रपट सलमानच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला नाही.

‘राधे’ या चित्रपटाला समिक्षकाकंडुनही चांगली प्रतिक्रिया मीळाली नाही. राधेने सलमानच्या चाहत्यांची घोर निराशा केली आहे. तर आयएमडीबी या वेबसाईटवर सलमानच्या चित्रपटाला २.४ इतकी कमी रेटिंग मिळाली आहे. जितकी लोकप्रियता ‘राधे’ची प्रदर्शनाआधी होती तीतका लाभ चित्रपटाला प्रदर्शित झाल्यानंतर मिळाला नाही. ‘राधे’ची कथा खुपच सर्वसाधारण असल्याचे मत चाहत्यांनी मांडले आहे. सलमानचे चाहते केवळ त्याच्या प्रेमापोटी आणि स्वत:चे निखळ मनोरंजन करण्यासाठी प्रेक्षक त्याचा चित्रपट पाहतात.

मात्र ‘राधे’ने त्यांची घोर निराशा केली आहे. याआधी सलमानच्या ‘रेस ३’ या चित्रपटाला १.९ इतकी रेटिंग मिळाली होती. ‘राधे’ चित्रपटात सलमान खान व्यतिरीक्त दिशा पटानी, जॅकी श्रॉफ आणि रणदिप हुडा यांच्या भूमिका आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवाने केले आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP