सलमानचा ‘बिग बॉस’ सीजन १५ टीव्हीवर नाही तर ओटीटीवर होणार रिलीज

सलमान खान

मुंबई : ‘बिग बॉस’१५  आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र यावेळी बिस बॉस १५ चा सीजन ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे. गेले काही दिवस या शो ची प्रचंड चर्चा होत आहे, तसेच हा शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार असल्याची देखील चर्चा होती. यावर आता ईद निमित्ताने सलमान खानने बिग बॉस ओटीटीचा पहिला प्रोमो रिलीज करत ही अधिकृत घोषणा केली आहे. येत्या ८ ऑगस्ट पासून बिग बॉस शो ओटीटीवर पाहायला मिळणार आहे.

या शोमधील स्पर्धकांची अंतिम यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. बिग बॉस आधी ‘वूट’वर दिसणार आणि मग टीव्हीवर रिलीज होणार आहे. वूटने नुकतंच्या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा प्रोमो शेअर केला आहे.

या प्रोमोमध्ये सलमान खान म्हणतो की, ‘आतापर्यंतचा सगळ्यात सेंसेशनल सीजन ठरणार. इतका क्रेझी असणार की टीव्हीवर बॅन होऊन जाणार, या शो मध्ये जनता फॅक्टर सगळ्यात आधी आणि लोकांच्या हातात पॉवर असणार. शोमध्ये ड्रामा, एंटरटेनमेंट आणि इमोशन हे सारं काही असणार आहे. शो कडून तुम्हाला वचन देतो. आता हे किती खरंय हे तुम्हाला शो सुरू झाल्यावर लक्षात येईल.’

बिग बॉस ओटीटी ८ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्याच्या सहा आठवड्यानंतर १५ ऑक्टोंबरपासून हे एपिसोड्स टीव्हीवर दिसणार आहेत. त्यामूळे चाहत्यांना त्यांच्या वेळेनुसार हे  एपिसोड्स पाहता येणार  आहे. आता ‘बिग बॉस १५’ सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने ‘बिग बॉस’ शो च्या चाहत्यांमध्ये आणखी उत्सुकता वाढली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP