fbpx

 टीम इंडियाने घेतला सलमानच्या ‘भारत’ चित्रपटाचा आनंद 

टीम महाराष्ट्र देशा : बॉलीवुडचा सुलतान सलमान खानचा ‘भारत’ चित्रपट ईदच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात आला. त्यानंतर दिवसेंदिवस ‘भारत’च्या कमाईचा आलेख वाढतानाचं पाहायला मिळत आहे. बॉक्स ऑफिस तब्बल २०० करोड पर्यंत ‘भारत’ ने मजल मारली आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये सलमानचा ‘भारत’ चित्रपट २०० करोड क्रॉस करेल. ‘भारत’ च्या कमाईमुळे आपल्या लक्षात येईल की हा चित्रपट प्रेक्षकांना किती आवडला आहे.

याचप्रमाणे ‘भारत’ चित्रपट पाहण्याचा मोह भारतीय क्रिकेट टीमदेखील आवरता आला नाही. भारतीय टीम विश्व कप खेळण्यासाठी इग्लंड मध्ये आहेत. मैदानावर भारतीय टीम चांगली कामगिरी बजावत आहे. पहिल्याच मॅचमध्ये साउथ आफ्रिका आणि दुसऱ्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला भारतीय टीमने चांगली टक्कर दिली आहे. न्यूजीलैंड सोबत भारतीय टीमचा तिसरा सामना होणार आहे.

या दरम्यान भारतीय टीमने लंडन मध्ये सलमान खान आणि कटरीना कैफ चा ‘भारत’ चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर काही खेळाडूंनी फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहे. या फोटोमध्ये एमएस धोनीसोबत हार्दिक पांड्या, केएल राहुल, केदार जाधव, शिखर धवन दिसत आहे. हा फोटो शेअर करत ‘भाईजान’ सलमान खानला शुभेच्छा दिल्या आहे. तसेच सलमान खानने सोशल मिडियावर केदार जाधव ला रीट्वीट करताना लिहिले की, ‘भारत’ चित्रपटाला पसंती दिल्याबदल भारतील टीमचे सलमानने आभार मानले. तसेच पुढच्या मॅचला सलमान खानने शुभेच्छा दिल्या.