कोरोना काळातही ‘या’ तीन चित्रपटगृहात प्रदर्शित होणार सलमान खानचा बहुप्रतिक्षीत ‘राधे’

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. या संसर्गामुळे संपुर्ण देश मोठ्या संकटातून जात आहे. या संकटाच्या काळात देशवासीयांना दोन क्षण मनोरंजन म्हणून चित्रपटाकडे बघितले जाते. त्यात सलमान खान सारखा सुपरस्टारचा चित्रपट म्हणजे चाहत्यासाठी पर्वणीच.

आज १३ मे रोजी सलमान खानचा बहुप्रतिक्षीत ‘राधे’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. कोरोना संसर्गामुळे हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शीत करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. मात्र देशभरात कोरोनाचा कहर सुरु असतानाही ‘राधे’ हा तीन चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. भारतातील पुर्वोत्तर राज्यातील त्रिपुरा राज्यातील चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. एसएसएल सिनेमा प्रायव्हेट लिमीटेडचे सीईओ सतादीप सता यांनी त्यांच्या आगरतळा येथील त्यांच्या चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. हे तीन चित्रपटगृह रुपासी, बालाका आणि धर्मनगर येथे हा चित्रपट प्रदर्शीत होणार आहे.

पण त्रिपुरा राज्यात नाइट कर्फ्यु लागु असल्याने चित्रपटाचा शेवटचा शो हा दुपारी ३ वाजता ठेवण्यात आला आहे. मात्र इतर चाहत्यासाठी हा चित्रपट झीफ्लेक्स आणि झी-फाइव्ह या ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ओटीटीवर हा चित्रपट बघण्यासाठी २४९ एका शो साठी भरावे लागणार आहे. तसेच कोरोना परिस्थीती ओसरल्यानंतर हा चित्रपट पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा मानस सलमान खानचा आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP