सलमानचं ट्वीट ‘मुझे लडकी मिल गई’, दुसरं ट्वीट करुन दिले स्पष्टीकरण

वेब टीम-  सलमाननेच त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन ‘मुझे लडकी मिल गई’ असं ट्विट करत सर्वांनाच कोड्यात टाकलं होत.  ‘मुझे लडकी मिल गयी’…. या सलमानच्या एका ट्वीटमधील चार शब्दांनी चाहत्यांमध्ये एकच धमाल उडवून दिली.

मात्र सलमानला लग्नासाठी कोणी मुलगी भेटली नसून, ‘लवरात्री’ या चित्रपटासाठी अभिनेत्री भेटली आहे. वरिना असं तिचं नाव असून, सलमानने दुसरं ट्वीट करुन दिले स्पष्टीकरण. सलमान खानची बहीण अर्पिताचा पती आयुष ‘लव्हरात्री’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली आहे.काही जणांनी सलमानला ट्रोल करायलाही सुरुवात केली आहे. ‘लडकी मिली है या आंटी?’, ‘अगर आप थायलंड में हो तो चेक कर लेना, लडकी नही होगी’ असे ट्वीट्स काही जणांनी केले आहेत.

सलमानला लग्नासाठी मुलगी मिळाली, की आगामी चित्रपटाला हिरोईन, असा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र सलमानने हा सस्पेन्स फारसा ताणून न धरता खुलासा करुन टाकला.’नथिंग टू वरी ना, आयुष शर्मा की फिल्म लव्हरात्री के लिये लडकी मिल गयी वरिना, तो डोंट वरी ना, बी हॅपी ना’ असं ट्वीट सलमानने केलं. त्यासोबतच वरिनाचा फोटोही शेअर केला. वरिना हुसैन असं अभिनेत्रीचं नाव असल्याची माहिती आहे.

You might also like
Comments
Loading...