सलमान खानला जीवे मारण्याची धमकी

सलमानच्या सुरक्षेत वाढ

टीम महाराष्ट्र देशा : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. काळवीट शिकार प्रकरणी हि धमकी दिल्याची शंका वर्तविण्यात येत आहे. पंजाब चा कुख्यात गॅंगस्टर लॉरेंस बिश्नोई याने हि धमकी दिली. गॅंगस्टर लॉरेंस बिश्नोईला एका व्यापाऱ्याच्या  हत्येप्रकरणी जोधपूरच्या जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्याने ही धमकी दिली आहे. जोधपूर पोलिसांनी या धमकीची दखल घेत सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोण आहे गॅंगस्टर लॉरेंस बिश्नोई

मूळचा पंजाबचा असलेला लॉरेंस बिश्नोई आता राजस्थानमध्ये आपली दहशत पसरवत आहे. गॅंगस्टर लॉरेंस बिश्नोईवर २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याचावर हत्येचा प्रयत्न, खंडणी, वसूली यासारखे गंभीर गुन्ह्यात तो आरोपी आहे. तसेच त्याने अनेक गुन्हेगारांना तसेच पंजाबच्या अनेक शूटर्सना आपल्या टोळीत सामिल करुन घेतले आहे. जोधपूर पोलिसांनी बिश्नोईला गोळीबार केल्याप्रकरणी अटक केली होती. व्यापारी वासुदेव इसरानी यांची हत्या केल्याप्रकरणी पुन्हा अटक करण्यात आली होती.

You might also like
Comments
Loading...