सलमान बिग बॉसच्या एका एपिसोडसाठी घेतो तब्बल ….

वेब टीम – बिग बॉस सर्वात गाजलेला रियालिटी शो. बिग बॉसचा ११ सीजन असून. सलमान खान या सीजनचा होस्ट आहे. बिग बॉसचा प्रत्येक सीजन अनेक वाद- विवादामुळे गाजत असतो.याबरोबर बिग बॉस गाजते ते सलमान खान घेत असलेल्या मानधनामुळे.

सलमान या सीजनसाठी एक किवां दोन कोटी घेतले नसून सलमानने तब्बल ११ कोटी पर एपिसोड घेतले असल्याची चर्चा सुरु होती. याबाबत सलमानने त्यांचे मौन सोडले आणि सलमान म्हणाला मला बिग बॉसच्या निर्मात्याने ११ करोड दिले तर आनंद होइल. तुम्ही या विषयी आमचे निर्माते राज यांना विचारा.

राजला या विषयी विचारले असता राज म्हणाला सलमान हा स्वस्तात काम करणारा अभिनेता नाही. तो जरी ११ करोड घेत नसला तरी ११ करोडच्या जवळपासच पैसे घेतो.